Motivational Marathi story | हात नसलेली शेफ | Motivational

Motivational Marathi Story | हात नसलेली शेफ | Inspirational Marathi Story

 

Motivational story in Marathi for success
Inspirational story in Marathi for success
Motivational stories in Marathi for Students
Short motivational stories in Marathi with moral
 


Marathi Moral Story | हात नसलेली शेफ | Inspirational Marathi Story

 

Motivational Marathi story | Inspirational Marathi story
Motivational story in Marathi | Inspirational story in Marathi

 

  

Read Inspirational story in Marathi :

हि एक सत्य घटनेवर आधारितएका भयानक त्रासातून गेलेल्या स्त्री ची कथा आहे. जेंव्हा तुम्ही ह्या मुलीची कथा वाचाल तेंव्हा तुम्हाला कळेल कि आपली दुःख किती लहान आहेत.


हि घटना आहे 25 सप्टेंबर 2000 चीमारिकेल आपटन नावाची झाम्बोआंग मधील हि ११ वर्षांची लहान मुलगी. दिसायला खूप छान. मध्यम आकाराचे डोळेनकटं नाक आणि चेहऱ्यावर नेहमी सुंदर smile असणारी.


ती तिच्या आई बरोबर राहत होतीतिथूनच काही  अंतरावर तिच्या काकांचे घर होते. मारिकेल नेहमी आपल्या काकांकडे पाणी भरण्यासाठी जात असायची. आजही तिचा तोच दिनक्रम काही चुकला नव्हता.


पण आजचा दिवस हा तिच्यासाठी एवढा वाईट असेल ह्याची तिला जराही जाणीव नव्हती. ती तिथे पोहचली. आणि  पाहते तर कायतिच्या काकांना चार माणसांनी घेरून ठेवले होतेआणि काका घुडघ्यावर खाली मान घालून  बसले होते. 


सुरवातीला तिला काही कळेना कि नेमकं काय घडत आहे. कारण जे चार माणसांना ती बघत होतीती माणसं त्यांच्याच आसपास राहणारे होते.


आणि काही कळायच्या आत त्या चिमुरडीच्या समोर त्या चौघांपैकी एकाने काकांच्या मानेवर सुरा चालवला. हे बघून मारिकेल घाबरली आणि जोरात किंचाळली.


आता त्या चौघांनी मारिकेल ला हि पहिले. आणि ते आता तिला मारण्यासाठी धावू लागले. मारिकेल हि जिवाच्या आकांताने पळू लागली पण त्या राक्षसी माणसांसमोर त्या चिमुरडीचा वेग तो किती ?


त्यांनी मारिकेल ला पकडलं. ती ओरडली , ”मला मारू नका! माझ्यावर दया करा!”


पण ते काही ऐकत नव्हते. त्यांनी लांब चाकूने तिच्या मानेवर हि वर केला. पण तोच वार इतका सजग झाला नाहीपण तेवढ्या हल्याने मारिकेल बेशुद्ध झाली.


जेंव्हा ती जागी झाली तेंव्हा तिला आसपास बरेच रक्त दिसलेतिने आजूबाजूंच्या माणसांचे पाय देखील पहिले. आणि ती तशीच मृतावस्थेच नाटक करत निपचित पडून राहिली.


जेंव्हा ते लोक निघून गेले.तशी मारिकेल आपल्या घरी पळत सुटली. वाटेत जात असताना तिला जाणवले कि आपले हात नाहीयेत कारण त्या लोकांनी ते कापून टाकले होतेतिला मधे मधे भोवळ हि येत होती पण ती कशीबशी घरी पोहचली.


घरी तिच्या आईने तिची अवस्था बघितल्यावर सुन्न झाली. तिलाही काही समजेना काय झाले आहे. मुलीची अवस्था पाहून आई हि दहशतीने ओरडली. तिने तिला एका कापडात गुंडाळून हॉस्पिटल ला नेले.


जेंव्हा ते रुग्णालयात पोहचले तेंव्हा डॉक्टरांना वाटले ती आता मरणार आहे . तरी त्यांनी तिच्यावर 5  तास  ऑपेरेशन करून 25 टाके घातले.


मारिकेल आता जिंवंत होती पण तिचे दोन्ही हात नव्हते.

शोकांतिका इथेच संपली नव्हतीते ज्यावेळी घरी परतले तेंव्हा त्यांनी पाहिलं कि त्यांचं संपूर्ण घर जाळून टाकलं होत.


खूप गरिबी असल्याने त्यांच्याकडे हॉस्पिटल चे पैसे द्यायला नव्हतेपण त्यांचे नातेवाईक देवदूत बनून आले आणि  त्यांनी हॉस्पिटल च बिल भागवले. त्याच नातेवाईकांनी त्या गुन्हेगारांना कोर्टात आणून त्यांना शिक्षा हि देण्यास  मदत केली.


पण ह्या सगळ्यात मारिकेल कुठे थांबली नाही. तिने नशिबाला किंवा देवाला कधीच दोष दिला नाही किंवा देत  राहिली नाही.


आपले हात नाहीत ह्या परिस्तिथीने ती कधी हतबल झाली नाही. उलट ती आता आपल्या मनगटांना अश्या काही  पद्धतीने वापरते कि तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही.


मारिकेल ला सर्वात मेहनती, computer मध्ये सर्वोत्कृष्ट आणि अपंग मुलांच्या शाळेतील सभ्य मुलगी म्हणून समजले जाई.


पुढे 2008 मध्ये तिने Hotel management मधून graduation हि केले आणि एवढेच नवे तर त्यात सुवर्ण पदक हि मिळवले.


                                                            

Maricel Apatan | Motivational story
Inspirational Marathi story


आणि आता जगभरात तिचा हात नसलेली शेफ म्हणून ओळख आहे.    

ह्या युवतीला आज तिच्या स्वप्नांपर्यन्त पोहचवण्यापासून कोणी रोखू शकलं नाही.

कारण सृष्टीचा नियम च आहेखरे विजेते कधीच हार मनात नाहीत .


Moral Of This Motivational Marathi Story


आयुष्य माणसाला काय काय रंग दाखवील सांगता येत नाहीजोवर आपल्यावर एखादा मोठा आघात होत नाही तोवर माणसं  आपलं वर्तमानात चाललंय तसंच सुरळीत आयुष्य सुरू राहणार असं गृहीतच धरून चाललेली असतात


आणि अचानक केव्हातरी अकल्पितपणे अशी एखादी भीषण घटना घडतेकी सारं होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्या धक्क्य़ाने माणसं पार कोलमडून पडतात.. उद्ध्वस्त होतात. काही माणसं त्यातच संपतात. काही त्यातून यथावकाश सावरतात. पुन्हा नव्यानं आपल्या आयुष्याची मांडामांड करतात. सगळ्यांनाच हे जमतं असं नाही.


अर्थात काळ हा सगळ्या आधीव्याधींवरचा रामबाण उपाय आहे.. आणि असतोच. तो आपलं काम करत राहतो. परंतु अशा एखाद्या भयाण संकटातदेखील त्यातून बाहेर पडण्याची माणसाची असामान्य वृत्ती उफाळून येते आणि मग अशी व्यक्ती त्या संकटावरही स्वार होत आपले झेंडे गाडते. अशांच्या कथा अजरामर होतात.

 

मनःपुर्वक आभार!



Read more motivational stories in Marathi

प्रेरणादायी कथा : वाळवंटात हरवलेल्या माणसाची गोष्ट

Depression ...आणि आपण  

आज का नाही ?


 

अशाच motivational stories in Marathi आणि inspirational stories in Marathi  वाचायच्या असतील तर आमच्या blog ला subscribe करा

आणि ई-मेल द्वारे notification मिळवा. आणि हि story (कथा) तुम्हाला कशी वाटली हे नक्की comment मध्ये कळवा.

 

धन्यवाद .....!

Previous Post
Next Post
Related Posts