Inspirational Story in Marathi | Depression... आणि आपण

Motivational stories in Marathi / Motivational stories for students / inspirational stories in Marathi / motivational success stories in Marathi / inspirational moral stories in Marathi

 
Motivational Marathi Story | Depression... आणि आपण | Inspirational Marathi Story

 

Motivational story in Marathi for success
Inspirational story in Marathi for success
Motivational stories in Marathi for Students
Short motivational stories in Marathi with moral

 

Marathi Moral Story | Depression... आणि आपण | Inspirational Marathi Story


Marathi story | Motivational Marathi story
Motivational Story in Marathi | Inspirational Story in Marathi

Read Inspirational Marathi Article: 

थोडे दिवसांपूर्वीच एका Bollywood अभिनेत्याने आत्महत्या केली हे आपल्या सगळ्यांना नक्कीच माहित असेल . ह्या आत्महत्येचं निकष depression असा आला तसा social media वर लोक consultancy चे status ठेवू लागले, messages पाठवू लागले.


हे सर्व पाहत असताना मला एका दुसऱ्या अभिनेत्याचा interview आठवला… हा  अर्थातच तो काही विचारवंत वगैरे नाही. पणत्याच्या मुलाखतीत मला आपल्या society बद्दलची सत्यता जाणवली.


त्याला विचारलं गेलं होतंः "तुझं दुःख तू कोणाशी शेअर करतोस?"


तोवर पोरकट हसत, jokes करणारा तो एकदम थांबला. गंभीर झाला.


म्हणाला, "कोणाशीच नाही! कारण समजा मी माझ्या सहका-यांसोबत दुःख शेअर केलंतर ते मला समजावतील. पणखासगीत हसतील. माझा रडका चेहरा बघून खुश होतील."


 

"माझ्या काही मित्रांशी मी ते शेअर करू शकतो. पणमला भीती आहे कीत्यांना याचाच आनंद होईल की साक्षात एवढा मोठा star  आपल्याशी एवढं पर्सनल काही शेअर करतोय!" 


 

"माझ्या खांद्यावर हात ठेऊनमला समजावताना काही लोकांचा ego सुखावेल."


 

"आईसारखे काही खूप जवळचे लोक आहेतज्यांच्याशी मी हे शेअर करू शकतो. पण चिंता अशी आहे कीहे लोक त्यामुळे स्वतःच एवढे निराश होतीलकी मला भीती वाटते."


 

"त्यामुळे अद्याप तरी मला असं कोणी मिळालेलं नाही की ज्यांच्याशी मी माझं दुःख शेअर करू शकेन!"

 


मग प्रश्न उरतो मनातला हा अंधार खरंच कोणासोबत शेअर करायचा

 

आपल्यापैकी प्रत्येकजण ह्या अंधारातून जातो. पणहा अंधार दर्शवणारी अशी कोणतीच गोष्ट आपल्याकडे नाही. किंवा आजकालच्या social media च्या भाषेत सांगायचं झालं तर हा अंधार दाखवणारी कोणतीच emoji” आपल्याकडे  नाहीय.


आणि तो व्यक्त करण्याची कोणाची तयारी हि नाहीय. कारण दुसऱ्याच्या अंधाराबद्दल  ऐकताना आपल्यला आपलाच अंधार मोठा वाटत असतो आणि आपण समोरच्याकडे दुर्लक्ष करतो.


आणि ह्या अंधारच मोठं साम्राज्य तयार झालय हे आपल्यला कळत हि नाही.


मग असं आहे का कि लोक दुःखी आहेत किंवा depression मध्ये आहेत हे आपल्यला समजत नाही. तर असं  आजिबात नाही. कारण एखाद्याच्या दुःखाचं gossip आपण खूप चांगल्या पद्धतीने करतोत्याची चेष्टा होते किंवा “बरं झालं… आपला एक competitor कमी झाला”असही लोकांना वाटत.


तुमच्याबद्दलच आठवून बघा नाएखाद्या दिवशी तुम्ही office मध्ये थोडे निराश किंवा थकलेले दिसला तर किती लोक तुम्हाला येऊन विचारतातखूप कमी किंवा मी तर म्हणेन त्या विचारण्यात जरा सुद्धा आत्मीयता नसते.


त्यामुळे शून्यच म्हणावं लागेल. पण मात्र ,”Did you see his/her face, I think त्याला प्रोमोशन नाही मिळत बर का ”असं  gossip झाल्या शिवाय राहणार नाही.


मग कला क्षेत्रात याचा प्रादुर्भाव कसा कारण कला क्षेत्राला आनंद देणारे क्षेत्र म्हणून आपण बघतो. तरीसुद्धा ह्या आनंदाचे झरे फुलवणाऱ्या क्षेत्रात सुद्धा एकमेकांचं जगणं संपवून टाकण्यासाठी लोक टपलेले असतात.


कुठलेच क्षेत्र ह्याला अपवाद नाही.

हा मानवी स्वभाव कसा आहेतेच समजत नाही. 


 

आपल्यासमोर आपला एखादा मित्र चालता चालता घसरून पडलातरी 'Reflex actionसारखे आपल्याला आधी हसू फुटते. मग आपण त्याला उठवण्यासाठी हात देतो!


 

माणसं दिसतात सोबतपण किती जखमी करत असतात एकमेकांना! बोचकारत असतात. ओरबाडत असतात. घर नावाचं भारतीय प्रारूप हे तर ऊब कमी देतं आणि ऊर्जा अधिक शोषतं.

जिथं 'प्रेमात पडले', हे मुलगा किंवा मुलगी घरी मुक्तपणे सांगू शकत नाहीतिथं आणखी काय संवाद होणार?


आपल्यासारख्या आध्यात्मिक देशात तर हा भोंदूपणा भयंकर आहे. भौतिक गोष्टींचे आकर्षण नाहीअसे म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यासाठी एकमेकांचा जीव घ्यायला सज्ज व्हायचे!


प्रतिभाप्रयत्न याच्या आधारावर प्रगती करण्याची आकांक्षा बाळगण्यात गैर काही नाहीच. पणत्यासाठी माणसं बाद करण्याचीत्यांना मारून टाकण्याची हि कसली विकृती म्हणायची?

अशा वेळी कोण कोणाशी बोलेलसंवाद कसा होईल


 

जगणं हे मूलभूत आहे. प्रसिद्धीपैसायश अशी आकांक्षा असू शकतेचपण ते काही जगण्याचे प्रयोजन नाही. जगणे हेच जगण्याचे प्रयोजन आहे. 

 


तुम्ही कलेक्टर आहातस्टार आहातमंत्री आहातशिपाई आहातउद्योजक आहात की शेतकरी आहातयामुळे त्यात काही फरक पडत नाही.त्याचा पदाशी वा पगाराशी काही संबंध नाही. हे डोक रूंदावणंमन विशाल करणं हेच गुपित आहेतुमचं जग व्यापक करण्याचं. मग कळतंजगण्यात मौज आहे.


त्यासाठी आपलं जग तर बदलावं लागेलचपण 'माणूसम्हणून हा भवतालही बदलावा लागेल. आपली जगण्याची गोष्ट आहेतशी प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट आहे. ती समजून घ्यावी लागेल. त्यासाठी कोणाच्या मागे नाही. त्याच्याशी थेट बोलावं लागेल.


तेव्हाबोलू एकमेकांशी आणि मुख्य म्हणजेएकमेकांशी बोलण्याचा अवकाश जिवंत ठेऊ. नाहीतरसुशांतसारखे काही आत्महत्या करतीलउरलेले रोज मरत-मरत दिवस काढतील.

 


हे जग सुंदर करायचं असेल आणि जगण्यायोग्य करायचं असेलतर आधी छान निखळ माणूस व्हावं लागेल. माणसांची निरपेक्ष सोबत करावी लागेल. तुम्ही कोणावर प्रेम करतातेव्हा तुम्ही स्वतःवरही प्रेम करायला शिकता.


तुम्ही कोणावर विश्वास ठेवतातेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास अढळ होत जातो. तुम्ही कोणाशी बोलतातेव्हा स्वतःशीच बोलत असता! आपल्यामुळं कुणाचा गेम झालायापेक्षा आपल्यामुळं कोणाच्या चेह-यावर हसू फुललंयाचा आनंद किती थोर असतो! हेच तर जिंकणं आहे!

 

मी आहे यारकारण तू आहेस. आपण आहोत.  

 

मनःपुर्वक आभार!

 

Read more motivational stories Marathi

प्रेरणादायी कथा हात नसलेली शेफ

प्रेरणादायी कथा : आज का नाही?

 

अशाच motivational stories in Marathi आणि  inspirational stories in Marathi वाचायच्या असतील तर आमच्या blog ला subscribe करा

आणि ई-मेल द्वारे notification मिळवा. आणि हि story (कथा) तुम्हाला कशी वाटली हे नक्की comment मध्ये कळवा.

 

धन्यवाद .....!

Previous Post
Next Post
Related Posts